"काळजी घ्या" - रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम...
"काळजी घ्या" - रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम...
पनवेल  :   आरटीओ पनवेल, महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना, ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे औचित्य साधून "काळजी घ्या" हा रस्ता सुरक्षते विषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम ओमकार मोटर ट्रेनिंग स्कूल कामोठे येथे घेण्यात आला.  
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमदार विक्रांत पाटील साहेब, ARTO निलेश धोटे, नांदकर, अशोक वारे, काकडे, विजया चामे, संघटनेचे उपाध्यक्ष विवेक खाडये, सचिव सुजित भगत, कार्याध्यक्ष सतिष आचार्य, सहखजिनदार अभिजित लगड व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जॉइंट कमिशनर महाराष्ट्र राज्य जयंत पाटील, डेप्युटी आरटीओ पनवेल जयंत चव्हाण महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर अण्णा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मार्गदर्शन केले, तसेच ओमकार ट्रेनिंग स्कूलच्या संचालिका शिल्पा नितिन मावळे, शेखर भागवत, श्रिया नितिन मावळे व त्यांचे कुटुंबीय , पूर्ण स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. नितिन मावळे यांचे कामाचे स्मरण करण्यात आले.
Comments