विवाहित महिला सुंदरी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद ; सुधाकर घारे युथ फाउंडेशनचा उपक्रम..
‘खोपोली युथ नाईट’ मध्ये युवा-तरुणांचा जल्लोष..
अलिबागच्या प्रिती पाटील ‘क्वीन ऑफ खोपोली’..


पनवेल / प्रतिनिधी  - : सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित ‘खोपोली युथ नाईट २०२५’ स्पर्धा खोपोली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेता अभिनय सावंत यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची रंगत वाढली.  लहान मुलांपासून विवाहित महिलांपर्यंत सर्व गटातील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग घेतला. खोपोलीतील जनता महाविद्यालयातील उज्ज्वल रंगमंचावर ही स्पर्धा जल्लोषात संपन्न झाली.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोपोलीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव देखील सुधाकर घारे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

सुधाकर घारे फाउंडेशन आयोजित खोपोली युथ नाईट २०२५ या स्पर्धेला खोपोलीत उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेअंतर्गत शायनिंग स्टार (मुले), शायनिंग स्टार (मुली), ज्यू. प्रिन्स, ज्यू. प्रिन्सेस तसेच प्रिन्स ऑफ खोपोली, प्रिन्सेस ऑफ खोपोली आणि विवाहित महिलांसाठी ‘क्वीन ऑफ खोपोली’ अशा मोफत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील विविध भागातून जवळपास १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच विवाहित महिलांसाठी असलेल्या क्वीन ऑफ खोपोली स्पर्धेसाठी १७ विवाहित महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. खोपोलीतील जनता महाविद्यालयातील उज्ज्वल रंगमंच्यावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी खोपोलीतील नागरिकांनी तुडूंब गर्दी केली होती. दीप प्रज्वलन दत्तात्रय मसुरकर, उल्हासराव देशमुख यांच्या हस्ते झाले.

 अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेता अभिनय सावंत यांच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा अतिशय बहारदार झाली. तर पुण्याच्या प्रतिभा पाटील यांच्या सुत्रसंचालनामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमासाठी अंकित साखरे, रोहिदास पिंगळे, संतोष बैलमारे, मनिष यादव, कैलास गायकवाड, एकनाथ धुळे, कुमार दिसले, बंधू देशमुख, स्वप्नील पालकर, भुषण पाटील, रंजना धुळे, वैशाली जाधव, मधुरा चंदन, शिल्पा सुर्वे आदी उपस्थित होते.

"विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव"
उद्योजक मयुर जैन, वयोवृद्ध लोकांची सेवा करणारे खोपोली येथील अब्दुल रहीम सोरटीया, सामाजिक कार्यकर्त्या अनिसा पाटीक, यशस्वी महिला उद्योजिका शितल कोठारी, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या खोपोलीतील भक्ती साठलेकर, खोपोलीतील पत्रकार बाबू पोटे, कामगार प्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यकरणारे खोपोलीतील रविंद्र कांबळे, वृद्धाश्रमातील वृद्धांची मोफत वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. युगांता म्हात्रे -आंग्रे यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी गौरव केला.

'अलिबागच्या प्रिती पाटील ‘क्वीन ऑफ खोपोली’'

खोपोली युथ नाईट २०२५ स्पर्धेनिमित्त घेण्यात आलेल्या क्वीन ऑफ खोपोली या विवाहित स्पर्धेत अलिबागच्या प्रिती पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून क्वीन ऑफ खोपोलीच्या मानकरी ठरल्या. तर व्दितीय क्रमांक वृषाली पाटील (खोपोली) आणि तृतीय क्रमांक अश्विनी पुजारी (खोपोली) यांनी पटकावला. बेस्ट फोटोजेनिक फेस हा पुरस्कार सृष्टी पाटील (खोपोली) बेस्ट लुक पुरस्कार हिमानी गायकर (खोपोली) यांनी पटकावला.

"प्रिन्स ऑफ खोपोली स्पर्धा विजेते"
प्रथम क्रमांक : शुभम पाटील (खोपोली)
व्दितीय क्रमांक : भावेश चिले (खोपोली)
तृतीय क्रमांक : यश दळवी (खोपोली)

"प्रिन्सेस ऑफ खोपोली स्पर्धा विजेते"
प्रथम क्रमांक :  दिशा कोठारी (खोपोली)
व्दितीय क्रमांक : प्रिया पाटील (रसायनी)
तृतीय क्रमांक : सानिका कोठेकर (पेण)

*शायनिंग स्टार स्पर्धा विजेते*
शायनिंग स्टार (मुले)
प्रथम क्रमांक : अयुश गणपते (खोपोली)
द्वितीय क्रमांक : श्लोक नवले (खोपोली)
तृतीय क्रमांक : आयुष चौधरी (खोपोली)

 "शायनिंग स्टार (मुली)"
*प्रथम क्रमांक : नायरा सुर्वे (कर्जत)
द्वितीय क्रमांक : नाझिया करंजीकर (खोपोली)
तृतीय क्रमांक : आराध्या पुरी ( खोपोली)

*ज्यूनियर प्रिन्स स्पर्धा विजेते*
प्रथम क्रमांक : अर्णव पाटील (खोपोली)
व्दितीय क्रमांक : स्पर्श कांबळे (खोपोली)

*ज्यूनियर प्रिन्स स्पर्धा विजेते*
प्रथम क्रमांक : रावी ठाकुर (लोणावळा)
व्दितीय क्रमांक : तनुश्री जळे (खोपोली)

लकी ड्रॉ विजेते
१) मनस्वी देशमुख (खोपोली)
२) बाबू मोरे (खोपोली)
३) प्राजक्ता लोटे (खोपोली)
Comments