अपोलोने रुग्णालयात पाणी, ऊर्जेची बचत, सामग्री, कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात सस्टेनेबल प्रथांचा समावेश केला
नवी मुंबई / पनवेल वैभव, ४ मार्च २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पर्यावरण शाश्वततेचे एक प्रमाण ही आपली ओळख मजबूत करत, आपल्या इमारतींचे डिझाईन, बांधकाम दृष्टिकोन, संचालन व देखरेख पैलूंच्या संदर्भात सस्टेनेबल प्रथांचा समावेश केला आहे, ज्यामुळे या इमारती 'ग्रीन बिल्डिंग' बनतात.
'ग्रीन बिल्डिंग' ती असते जी पारंपरिक इमारतींच्या तुलनेमध्ये पाण्याचा उपयोग कमी करते, ऊर्जा बचत करण्याच्या क्षमतेला जास्तीत जास्त वाढवते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करते, कचरा कमी प्रमाणात निर्माण होतो आणि त्या इमारतींचा वापर करणाऱ्यांसाठी एक निरोगी स्थान प्रदान करते. 'ग्रीन बिल्डिंग' बनवण्यासाठी बांधकाम आणि त्यानंतरचे संचालन व देखरेख या दोन्हींमध्ये एका व्यापक दृष्टीकोनाची आवश्यकता असते.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आपल्या इमारतींमध्ये आर्किटेक्चरल डिझाईन सुविधा, पाणी आणि ऊर्जेची बचत करण्याची क्षमता, सामग्री, कचऱ्याचे व्यवस्थापन, इनडोअर हवेची गुणवत्ता, इमारतींचा उपयोग करणाऱ्यांसाठी थर्मल कम्फर्ट आणि इतर पर्यावरणात्मक पैलूंवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 'ग्रीन बिल्डिंग' सामान्य इमारतींपेक्षा वेगळी दिसत नाही पण तिचे संचालन आणि देखरेख पैलूंमध्ये फरक असतो. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या इमारती बांधल्या जाण्याच्या वेळेपासूनच पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे.
श्री तुलसीनाथन एस, जनरल मॅनेजर-मेंटेनन्स, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,"सस्टेनेबिलिटी हा आमच्या संचालनाचा एक भाग आहे, कुशल प्रकाश व्यवस्था, एयर कंडिशनिंग सिस्टिम, मोटर आणि पंपमार्फत ऊर्जेचा वापर कमी करण्यापासून, व्हर्जिन सामग्रीच्या ऐवजी रिसायकल्ड आणि रियुज्ड सामग्रीचा समावेश करण्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी आम्ही सस्टेनेबिलिटीची काळजी घेतो. आम्ही रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि कुशल प्लम्बिंगमार्फत २६६०३८ केएल पाण्याची बचत केली आहे, स्मार्ट लायटिंग, HVAC आणि इन्व्हलप इफिशियन्सीमार्फत ४५७८३ MWh ऊर्जेचे संवर्धन केले आहे आणि नूतनीकरणीय ऊर्जा व कार्यक्षमता उपायांचा वापर करून ५४.७ M+Kg कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले आहे. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांनी दर दिवशी २५० किलोग्रॅम कंपोस्टरचा उपयोग करून ९७० टन जैविक कचऱ्याला डायव्हर्ट केले आहे आणि आम्ही विषाणुरोधी सरफेस कोटिंग्स आणि हाय इफिशियन्सी एयर फिल्टरेशनसह संसर्ग नियंत्रण सुनिश्चित करतो. याखेरीज आम्ही लँडफिलचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅप्टिव्ह पॉवर जनरेशन तैनात करतो आणि जिथे कचरा निर्माण होतो तिथेच तो वेगवेगळा करतो. सस्टेनेबिलिटीसाठी आमची वचनबद्धता संरक्षणापेक्षा मोठी आहे, आम्ही सर्वांसाठी एक निरोगी आणि अधिक सस्टेनेबल भविष्य बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत."
अशा इमारती ग्राहकांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन, पाणी बचतीची क्षमता, वाहतुकीमध्ये जीवाष्म इंधनाचा कमी वापर, ऊर्जा बचत करण्याची क्षमता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यासारख्या राष्ट्रीय मुद्द्यांचे निवारण करण्यात मदत करू शकते. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की, या इमारती याठिकाणी काम करणाऱ्या, त्यांचा वापर करणाऱ्यांचे आरोग्य, आनंद आणि कल्याण यांना प्रोत्साहन देते.