पनवेलमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन शोरूम...
पनवेलमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन शोरूम

पनवेल (पनवेल वैभव) २७ मार्च २०२५: विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने नवी मुंबईतील पनवेल येथील एमसीसीएच सोसायटीमध्ये त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली. ३,१४६ चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलींमध्ये दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे. हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कारागिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवण्याच्या मलाबार ब्रॅण्डच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे.

हे शोरूम ब्रँडचे भारताच्या पश्चिम विभागातील ४३ वे विक्री दालन आहे, जे या प्रदेशात त्याची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत करते. नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ लोकसभेचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्यवस्थापन पथकाचे सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

भारत, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह १३ देशांमध्ये ३९० हून अधिक शोरूम्ससह, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे. आपली उपस्थिती आणखी मजबूत करत, ब्रँड विद्यमान मार्चमध्ये संपूर्ण भारतात १२ नवीन शोरूम उघडण्यास सज्ज झाले आहे, ज्यामुळे प्रीमियम दागिने ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनवण्याची त्याची वचनबद्धता आणखी दृढ होईल. २६ देशांमधील २२,००० बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित संघाच्या पाठिंब्याने, ब्रँडने जगभरातील १.५ कोटींहून अधिक समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे.

नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाइन केलेले सोने, हिरे, प्लॅटिनम, रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपारिक डिझाइनपासून ते आधुनिक साजशृंगारासाठी समकालीन शैलींपर्यंत, विविध पसंतीक्रमांना हे शोरूम  पूर्ण करते.

या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधून दिलेल्या निवेदनात, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “पनवेल येथे आमचे शोरूम उघडताना आम्हाला खूप आनंद होत आहे, हे शहर त्याच्या धोरणात्मक स्थान, जलद शहरी विकास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये, आम्ही कालातीत सुंदरतेचा अपवादात्मक कारागिरीशी मिलाफ साधणारे दागिने देण्यासाठी समर्पित आहोत. गुणवत्ता, सचोटी आणि ग्राहकांच्या समाधानावर भर देऊन, आम्ही आमच्या दागिन्यांचे सर्वोत्तम संग्रहण पनवेलमध्ये आणण्यास आणि येथील उत्साही समुदायाला एक अविस्मरणीय खरेदी अनुभव प्रदान करण्यास उत्सुक आहोत.”

ग्राहकांना परिपूर्ण दागिने निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शोरूमची रचना उत्कृष्ट प्रदर्शन सज्जे आणि उच्च प्रशिक्षित संघासह एक परिपूर्ण खरेदी अनुभव प्रदान करण्यासाठी केली आहे. या ऐसपैस जागेचे उद्दिष्ट ग्राहकांना प्रशस्त आतील भाग आणि भरपूर वाहनतळ सुविधेसह एक अद्वितीय दागिने खरेदी अनुभव प्रदान करणे हे आहे.

हे शोरूमचे अनावरण जगातील सर्वात पसंतीचे ज्वेलर्स बनण्याच्या, पारंपारिक कारागिरीला आधुनिक नवोपक्रमाशी एकजीव करण्याच्या, तसेच शाश्वतता आणि सामाजिक कल्याणाला प्राधान्य देत कालातीत नमुने तयार करण्याच्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या दृष्टिकोनाला उजाळा देणारे आहे. 

.
Comments
Popular posts
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्यदिव्य कार्यक्रम ...
Image
नवं वर्ष स्वागत समिती आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रेच्या स्वागतासाठी आ.विक्रांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य महाकुंभ नगरी साकार...
Image
कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले - रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार ...
Image
शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ५० लाख रुपयांची देणगी जाहीर...
Image
नैना प्रभावित क्षेत्रातील बंद असलेले खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन त्वरित सुरु करणे संदर्भात आ.विक्रांत पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा...
Image