गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्यदिव्य कार्यक्रम ...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्यदिव्य कार्यक्रम 
पनवेल / प्रतिनिधी   - : पनवेल येथील कल्पतरू सोसायटीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवचरित्राचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. हा सोहळा म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचं सजीव चित्रण होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, ब्रह्माजी, आणि संपूर्ण सांस्कृतिक कमिटी यांच्या नेतृत्वाखाली कल्पतरूने गेल्या दहा वर्षांत विलक्षण प्रगती केली असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. 
          श्रीरामाच्या युगापासून सुरू झालेली गुढीपाडव्याची परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून नव्या उंचीवर नेली. हाच वारसा जपत कल्पतरू सोसायटीतील बालगोपाळ, तरुण, प्रौढ आणि सत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या अभिनयाने शिवरायांचा जन्म, बालपण, स्वराज्यस्थापना आणि राज्याभिषेकाचे तेजस्वी क्षण अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रोशन आंग्रे, रेवा आंग्रे यांनी कोरिओग्राफी केली होती. मराठी आणि इतर भाषिक या सर्वांनी ऐतिहासिक कार्यक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
Comments
Popular posts
नवं वर्ष स्वागत समिती आयोजित भव्य दिव्य शोभा यात्रेच्या स्वागतासाठी आ.विक्रांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य महाकुंभ नगरी साकार...
Image
कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले - रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार ...
Image
शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून ५० लाख रुपयांची देणगी जाहीर...
Image
नैना प्रभावित क्षेत्रातील बंद असलेले खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन त्वरित सुरु करणे संदर्भात आ.विक्रांत पाटील यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा...
Image