शिवसेना उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती

पनवेल वैभव/ प्रतिनिधी : -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती झाल्याने रायगड व पनवेल तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments