पनवेल मध्ये मुस्लिम बांधवानी केला पाकिस्तानसह आतंकवाद्यांचा निषेध...
पनवेल मध्ये मुस्लिम बांधवानी केला पाकिस्तानसह आतंकवाद्यांचा निषेध...
पनवेल दि.२३(वार्ताहर): काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले. नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष केले. या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सकल मुस्लिम समाज पनवेलतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद अशी निषेधात्मक घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
           पनवेल शहरातील मुस्लिम नाका येथील सुविधा मेडिकल जवळ सायंकाळी पाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली. काळे झेंडे दाखवत, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. दहशतवाद्यांनी मुसलमानांचे नाव घेऊन जो हल्ला केला त्यामुळे भारतात मुस्लिम समाज बदनाम झाला आहे. मुसलमानांच्या नावाने उद्या कोणीही काहीही करू शकतो. परंतु भारतीय मुस्लिम नेहमीच देश हितासाठीच जगणार आहे अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली. 
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात मुस्लिम महिला देखील सहभागी होऊन निषेध नोंदवत होत्या.  यामध्ये प्रामुख्याने इकबाल काझी, मा.नगरसेवक मुकीत काझी, जैनाब शेख,  संतोष पवार, सोफिया मुकादम, सलमान मुकादम, पंचशील शिरसाट, जमीर पठाण, सुश्मिता मोहिते, रेहाना हुसेन, नावेद पटेल, नवाद पटेल, अदनान अन्सारी,  बिस्मिल्ला करंबेळकर, सना शेख, सलमा कच्छी, रजिया कच्छी, कैकशा शेख, मॅरियम करंबेलकर यांच्यासह मुस्लिम समाजाला या मोर्च्यात पाठिंबा देण्यसाठी विविध समाज बांधव सहभागी झाले होते.
फोटो: निषेध मोर्चा
Comments