पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा दाऊदी बोहरा समाज पनवेलने केला जाहीर निषेध ...
पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा दाऊदी बोहरा समाज पनवेलने केला जाहीर निषेध ...
पनवेल वैभव दि.२५(संजय कदम): तीन दिवसापूर्वी पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये काही पर्यटकांचा मृत्यू झाला. तर कित्तेक जण जखमी झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पनवेलमध्ये दाऊदी बोहरा समाज अंजुमन ए नजमी जमात कमिटी पनवेलने निषेध व्यक्त केला. 
             
यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्रित येऊन त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व जाहीर निषेधाचा फलका द्वारे या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. 


फोटो: निषेध
Comments