पनवेल वाहतूक पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे घेतले भरुन...
पनवेल वाहतूक पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे घेतले भरुन...

पनवेल वैभव, दि.26 (संजय कदम) ः पनवेल वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अपघात टाळण्याच्या उद्देशाने रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेतल्याने त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिवशंभो नाका नो एंट्री पॉइंट वरील शहीद भोसले पेट्रोल पंप कडे जाणार्‍या रस्त्यावरील पडलेले खड्डे भरून घेण्याचे काम वाहतूक नियमन करत व सदर ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून पनवेल वाहतूक पोलीस हवालदार  युवराज येळे व अमीर मुलाणी यांनी स्वतः करून घेतले. यामुळे आगामी काळात होणारे अपघात टळणार असल्याने वाहनचालक व नागरिकांनी वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.



फोटो ः वाहतूक पोलिसांनी घेतले खड्डे भरुन
Comments