शिवसेना प्रवक्त्या व उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी केले देसले कुटुंबियांचे सांत्वन
पनवेल, दि.24 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या व उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आज खांदा वसाहतीमध्ये राहत असलेल्या देसले कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगामजवळील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 28 नागरिकांमध्ये पनवेलमधील खांदा कॉलनी येथील रहिवासी स्व.दिलीप देसले यांचा समावेश होता. त्यांचे घरी जाऊन आज शिवसेना प्रवक्त्या व उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. यावेळी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख रेवती सपकाळ, तालुकाप्रमुख सुजाता कदम, शहर संघटक अर्चना कुळकर्णी, ज्योती मोहिते, संगीता राऊत, मालती पिंगळा, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, युवासेना महानगरप्रमुख अवचित राऊत, युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, सनी टेमघरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
फोटो ः किशोरीताई पेडणेकर सांत्वन करताना