रविवारी रंगणार ओरायन मॉलचा वर्धापन दिन ; चार सेलेब्रिटी पाहुणे लावणार हजेरी ...
रविवारी रंगणार ओरायन मॉलचा वर्धापन दिन ; चार सेलेब्रिटी पाहुणे लावणार हजेरी ...
नवव्या वर्धापन दिनी नऊ विजेत्यांना करणार सन्मानित ....

पनवेल / प्रतिनिधी   - :
पनवेल शहरातील एकमेव मॉल म्हणुन प्रसिद्ध असलेल्या ओरायन मॉलचा नववा वर्धापन दिन दि.27 एप्रिल रोजी रविवारी आयोजित करण्यात आला आहे.या वर्धापन दिनी नऊ विजेत्यांना ओरायन मॉलच्या माध्यमातुन विशेष आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.याकरिता मॉल प्रशासनाने आयोजित केलेल्या शॉप अँड विन कॉन्टेस्टच्या विजेत्यांची निवड तब्बल चार मराठी सेलेब्रिटी करणार आहेत.
      या मराठी सेलेब्रिटी मध्ये स्मिता शेवाळे,नेहा नाईक , समीर चौघुले, इशा डे आदी उपस्थित राहून पनवेलकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी दिली.दरम्यान नऊ विजेत्यांपैकी प्रथम विजेत्याला यमाहा फसिनो स्कुटर आणि द्वितीय विजेत्यांना आय पॅड व इतर विजेत्यांना आकर्षक  बक्षिसे देण्यात येणार आहेत. रविवारी दि.27 एप्रिल  रोजी सायंकाळी 7.30 वाजता हा लकी ड्रॉ स्वतः सेलेब्रिटी विनर घोषित करणार आहेत.
Comments